शिस्त ....
गमवले दिन सखे मी
शिस्त अंगी बाळगण्यात
सांभाळून संसार तो मी
दिन जोडतेय जोडण्यात
बदल हाच माझ्यापुरता
लक्ष होते जीवनात
बदल हा रोपट्यांचा
ध्येय माझ्या जीवनाचा
लावली कलम मी
बगिच्यात या संसाराच्या
झाली कशी मी बागवान
मोहमायेच्या संसाराच्या
वाट पाहते तीच तशी मी
फुलेल गुलाब अंगणात
पसरेल गंध निशिगंधाचा
बकुळी अन रातराणीचा
सरतोय दिन हाच तसा तो
शिशिर अन वसंताचा
शोधतेय मी मला ते
आवाजात ..पानात नी पाचोळ्यच्या

Comments

Popular posts from this blog