चल जगणे जगून घेऊ !!!
बनून फुलपाखरू
आनंदाने नाचत बागडत राहू
फुला फुलावर बसून
सगळा सुंगध आपण लेवू
कशाला उद्याची भ्रांत
चल जगणे जगून घेऊ || धृ ||
सुंदर जग सारे
नेत्रात साठवून ठेवू
या रे सप्तरंग गंधात
आपण सारेजण न्हावू
कशाला उद्याची भ्रांत
चल जगणे जगून घेऊ || १ ||
उद्याच्या चिंतेत आजचे
क्षण कशास वाया लावू ?
चला कुढत बसणं आपण
कायमचं आता सोडून देऊ
कशाला उद्याची भ्रांत
चल जगणे जगून घेऊ || २ ||
हातात हात घालून
एकमेका संकटी साथ देऊ
जीवन पाण्याचा बुडबुडा
नाहीसे होण्याआधी जगून पाहू
कशाला उद्याची भ्रांत
चल जगणे जगून घेऊ || ३ ||
विसरून धर्म ,जात, वंश, पंथ सारे
मनामनात समतेची ज्योत लावू
आपण माणसे सारी मानवतेचे
तनामनात निशाण फडकत ठेवू
कशाला उद्याची भ्रांत
चल जगणे जगून घेऊ || ४||
बनून फुलपाखरू
आनंदाने नाचत बागडत राहू
फुला फुलावर बसून
सगळा सुंगध आपण लेवू
कशाला उद्याची भ्रांत
चल जगणे जगून घेऊ || धृ ||
सुंदर जग सारे
नेत्रात साठवून ठेवू
या रे सप्तरंग गंधात
आपण सारेजण न्हावू
कशाला उद्याची भ्रांत
चल जगणे जगून घेऊ || १ ||
उद्याच्या चिंतेत आजचे
क्षण कशास वाया लावू ?
चला कुढत बसणं आपण
कायमचं आता सोडून देऊ
कशाला उद्याची भ्रांत
चल जगणे जगून घेऊ || २ ||
हातात हात घालून
एकमेका संकटी साथ देऊ
जीवन पाण्याचा बुडबुडा
नाहीसे होण्याआधी जगून पाहू
कशाला उद्याची भ्रांत
चल जगणे जगून घेऊ || ३ ||
विसरून धर्म ,जात, वंश, पंथ सारे
मनामनात समतेची ज्योत लावू
आपण माणसे सारी मानवतेचे
तनामनात निशाण फडकत ठेवू
कशाला उद्याची भ्रांत
चल जगणे जगून घेऊ || ४||
Comments
Post a Comment