एक अनोळखी ...
तरी पण का वाटतंय..
तुजे आणि माजे नाते पूर्वीचे ते किती ..
ऋणानुबंध जुळले छान ते किती...
ना नाव माहिती होते ...
ना गाव माहिती होते...
तरी पण का वाटतंय ..
भेटले होते आधी कधी..
कळलेच नाही तू मला आवडलास कधी ..
समजलच नाही मी तुज झाले कधी..
एक अनोळखी..
म्हणून सोडून जाऊ नको ...
प्रीत हि हृदयाची तोडू नको..
एक अनोळखी..
म्हणून विश्वास सोडू नको..
आपले नाते विसरू नको..

Comments

Popular posts from this blog