कितीक जळतो जीव माझा असा तुझ्यावर...
भाळेल कसा तुझा जीव दुसऱ्या
कुणावर....
विसरले आज मीच मला तुझ्या अस्तित्वात.....
जगशील कसा तु गुंतून दुसऱ्या
कुणात....
किती संयम पाळावा माझ्या
अगतिकतेने.
आयुष्य जगशी कसा तु शांत
निरपेक्षतेने....
माझ्या वाटेवर तुझ्या आठवणींचा पाचोळा ...
तुझ्या बागेत मात्र बहर फुलल्या कळ्यांचा....
खिन्न मनाने रेंगाळत तुझी वाट कशी पाहू
वाटेवरी तुझ्या डोळे लावून आसवे किती ढाळू.…...
मीच एकटी, कुणी ना मला आज सोबती....
असेच जगावे का मी, तुझ्याचसाठी अधांतरी...
दाही दिशांत करते मजला चाहूल तुझी
बेधुंद
गुंतता तुझ्यात, भेटते माझी मलाच मी होऊन सैरभैर...

Comments
Post a Comment